Wednesday, 29 August 2012

जिंकतो तोच

नांगराचा फाळ निष्ठुरपणे
मातीचा उर चिरत जातो
मोकळ्या ढाकळ्या त्या तनुत
मग हिरवागार कोंब फुलतो

टाकीचे मस्तकावरील घाव
दगड किती निर्धाराने सोसतो
तुकडे कपचे पडत त्याला
ईश्वराचा  आकार येतो


अस्तित्वावर होणा-या घाल्यांनी
अभिमान राख राख होतो
त्या सत्वहीन राखेतुनच पण
फिनिक्स  नवी भरारी घेतो

नवनवे आघात पचवूनच
मनास एक कणखरपणा  येतो 
अडचणींचे डोंगर खोदुनच
मनगटात नवा जोश येतो

या  संकटांनी मग तुही
कशाला खचून जातो
' जिंकतो तोच ' नव्या उमेदीने
काळाशी जो टक्कर देतो


            -सुहास भुसे
       







Sunday, 26 August 2012

धमालपुरची शाळा भाग-२


धमालपुरची शाळा भाग -२ 
माझ्या इद्यार्थी मित्रांनो,
या लेखमालेत आपण धमालपुरच्या शाळेतील काही नमुनेदार इद्यार्थ्यांचे मासलेवाईक किस्से पाहत आहोत..आणि आजचा आपला इद्यार्थी आहे ...
       २) विजय ढेरे.
.
       इजू बद्दल बोलावे तेवढे थोडे आहे. लहानपणापासून अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टींत झळकणारे एक छंदी-फंदी व्यक्तिमत्व. कोणती विद्यार्थिनी कोठे राहते तिचा पत्ता अशा तपशीलांनी भरलेली याची वही एकदा मला सापडली तेव्हा मी याची जाम धुलाई केलि होती.
लहान असताना इजू अतिशय डेअरिंगबाज होता. पण हल्ली त्याची बायको त्याचे फार हाल करते असे ऐकून आहे. परवा शिवाजी (वाघमारे) सांगत होता विजूचा एक किस्सा.

      एकदा आपल्या दारुड्या मित्रांचे ( कोण मित्र ते सांगत नाही आपण ओळखून घ्या ) ऐकून विजुने जिवावरचे धाडस केले.
विजू(बायकोला) : “ काय ग ये ....फार झाल तुझ नाटक ....आजपासून तू सर्व भांडी धुवायची ..धूण धुवायचं ...उत्तम स्वयंपाक करून मला जेवायला वाढायचं ...माझ्या कपड्यांना कडक इस्त्री करून ठेवायची ...काय ग ये समजल का नाही ....आज मला योगेश देवकर च्या पार्टीला जायचं आहे ...सांग बर मग माझ्या बुटाला pa^laISa कोण करणार ..? “
बायको : “ ते मी सांगते सर्व ...पण आधी तुम्ही पलंगाच्या बाहेर तर या “

ख्या ख्या ख्या
या माझ्या हसण्यातून माझी माझ्या या माजी इद्यार्थ्याविषयीची सहानभूती जाणवलीच असेल ..

..
तर आता शाळेतला एक किस्सा सांगतो.
एकदा आमचे ग शी साहेब शाळा तपासणीला आले होते ....आले ते थेट आमच्या ५ वीच्या वर्गात ....
ग शी : “विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारेन “
इजू नेहमी मागच्या बाकावर बसून गोंधळ घालत असे ...आजही त्याची टंगळ मंगळ सुरूच होती ते पाहून साहेबांनी त्यालाच आधी उभे केले.
ग.शी. : “ ह बाळा तू मला कोणत्याही ५ प्राण्यांची नावे सांग बर .....”
विजय : “ दोन हत्ती आणि तीन सिंह ..”





       

धमालपुरची शाळा- भाग १


                    धमालपुरची शाळा- भाग १



हुश्श्य ..!!
अहो वात आणलाय या कार्ट्यांनी ...!!
आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हो ...
अहो इतके नाठाळ आणि टवाळ विद्यार्थी जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्या शाळेत नसतील.
शाळेत गुरुजींना आणि घरी पालकांना अगदी नाकी नउ आणले आहेत यांनी..
या लेखमालेतून म्हटल या पोरांचे काही नमुनेदार आणि मासलेदार किस्से तुम्हाला सांगावेत.....वाचा आणि या उनाड पोरांना कसे ताळ्यावर आणायचे याचा काही मार्ग सुचला तर आम्हाला सांगा.
..
..
१)      विध्यार्थी :- अनिल काळे .

  हा एक जुना विद्यार्थी आहे. बरीच वर्षे एकेका वर्गात काढून त्याने आपले शाळेवरचे प्रेम सिद्ध केले होते. सध्या दहावीत ५ वेळा नापास झाल्यानंतर स्वत: ची चहाची टपरी याने सुरु केलि आहे . पण त्यातला किमान ५० कप चहा तरी रोज स्वत: च पितो अशी वदंता आहे.

      याचा एक किस्सा सांगतो. अनिलला एकदा मधल्या सुट्टीत ग्राउंड वर कुल्फी विकणाऱ्या फेरीवाल्याने पकडून माझ्याकडे आणले. आता याने काय नवीन खोडी केलि म्हणून त्याच्याकडे चौकशी केलि असता त्याने जी हकीकत पुढीलप्रमाणे..

      अनिल सुट्टीत कुल्फिवाल्याकडे गेला .
      त्याने मोजून ५ कुल्फ्या खाल्ल्या.
      फेरीवाला म्हटला बर आहे.
      चांगल गिऱ्हाईक आहे.
      हातोहात चांगला धंदा झाला
      अनिल ने ऐटीत कुल्फ्या खाल्या आणि तसाच ऐटीत तो पुढे निघाला.
      त्यावर कुल्फिवाल्याने त्याला थांबवले आणि विचारले,
      “ अरे पैसे कोण देणार ? “
      त्यावर अनिलने जे मासलेवाईक उत्तर दिले त्यावरून तुम्हाला कळेल कि आमच्या शाळेतली पोर कशी नमुनेदार आहेत ते ..

      अनिल त्याला म्हणाला,
      “ कसले पैसे ? “
      कुल्फीवाला म्हणाला,
      “अरे तू ५ कुल्फ्या खाल्या नां, त्याचे पैसे ..”
      त्यावर अनिल म्हणाला ऐटीत
“ पैसे बैसे काही मिळणार नाहीत. माझ्या आईने सांगितलंय खायचा प्यायचा काहीही लाड चालेल पैश्याचा लाड अजिबात चालणार नाही.”