जीवनाचा अर्थच बदललाय तमाम
हवी आहे पुन्हा एकदा
एक नवी सुरवात, एक नवा आयाम
वसुचे चुंबन घ्याया
रवी जरा उतरला खाली
मावळतीवर बिंबित झाली
धरेच्या गालावरची लाली
तू दिलेला प्रत्येक घाव
जिव्हारी बसला होता
उमटलेल्या वेदनेने
तुला दुवाच दिला होता
चार शब्द लिहिले तुजविषयी
चार शब्द लिहिले मजविषयी
तुझे- माझे जगावेगळे प्रेम
चार ओळी त्या प्रेमाविषयी
सुहास भुसे.
(१६-०८-२०१२)
छान कविता!
ReplyDeleteधन्यवाद चिन्मय सर ......!!
ReplyDeleteखूप मस्त वाटल्या या चारोळ्या
ReplyDeleteधन्यवाद तुषार
ReplyDeleteखुप छान भाऊ
ReplyDelete