Thursday, 16 August 2012

चारोळ्या - १

अंधार दाटला आहे सर्वत्र
जीवनाचा अर्थच बदललाय तमाम
हवी आहे पुन्हा एकदा
एक नवी सुरवात, एक नवा आयाम


वसुचे चुंबन घ्याया 
रवी जरा उतरला खाली 
मावळतीवर बिंबित झाली 
धरेच्या गालावरची लाली 


तू दिलेला प्रत्येक घाव 
जिव्हारी बसला होता 
उमटलेल्या वेदनेने 
तुला दुवाच दिला होता 


चार शब्द लिहिले तुजविषयी
चार शब्द लिहिले मजविषयी
तुझे- माझे जगावेगळे प्रेम
चार ओळी त्या प्रेमाविषयी


सुहास भुसे.
(१६-०८-२०१२)


 

5 comments:

  1. धन्यवाद चिन्मय सर ......!!

    ReplyDelete
  2. खूप मस्त वाटल्या या चारोळ्या

    ReplyDelete
  3. धन्यवाद तुषार

    ReplyDelete
  4. खुप छान भाऊ

    ReplyDelete