
गल्लीतला शेर तो
पोरांसमोर ' डिंगा ' मारायचा,
त्याची मोठी ग्यांग होती
गावातही त्याचा 'वट ' असायचा.
कोणाच्या बापाला तो
कधी नाही भ्यायचा.
संकटात, अगदी ' कोपच्यातही '
तो बेडर बिनधास्त असायचा.

एका गोड पोरीवर तो
मनापासून मरायचा.
तिला पाहताच त्याचा
हार्ट थडा थडा उडायचा.

बोलण्यात मोठा चतुर,
चर्चेतही कधी नाही हरायचा.
'ती ' समोर येताच मात्र
त-त प-प करायचा.
तिने एक नजर फेकताच
याचा बलदंड देह थरकायचा.
गल्लीतला शेर तो
तिच्यापुढे कसा बिल्ली व्हायचा..
सुहास भुसे

:) Bhari...funny pics and real emotions! :)
ReplyDeleteधन्यवाद ऋषीका ..
ReplyDeleteतुझ्यासारख्या कवयित्रीकडून कौतुक ऐकून कान सुखावले.
बाकी हिरे कि कदर एक जोहरी को हि होती है.
..
पुनश्च धन्यवाद..
येत राहा
वाचत राहा
प्रोत्साहन देत राहा
वाह गुरुजी.... वाघच पार मांजर केल कि हो..... कविता वाचली.आणि वाटल माझ्याच गालात मारली का काय गुरुजीने..!!!!
ReplyDeleteपण वाचून मस्त वाटल बघा....
धन्यवाद अनिलराव ...!!
ReplyDeleteअहो अनेक मुलांना येणारा हा एक सार्वत्रिक स्वरूपाचा अनुभव आहे.
आम्हाला आला तसा तुम्हाला आला त्यात नवल काय ??
आणि मांजर मी नाही हो केल...
ती "ती" आहे.
तिच्या रूपात ती ताकदच असते ज्यायोगे ती वाघच मांजर बनवून टाकते.
ha ha ha khare aahe tumche, kon jane kuthali shakti aste ''ti'' t ki vagh pan ........
Deleteअहो अनिल राव
ReplyDeleteआणि त्या शक्तीचे एक लेटेस्ट उदाहरण म्हणजे आमच्या या कविता ....
यामागची प्रेरक शक्ती सुद्धा एक " ती " च असण्याची शक्यता आहे.
बाकी पुनश्च: एकदा धन्यवाद ...
आपण वारंवार आम्हाला प्रोत्साहित करता ...
या कवितामागची दुसरी प्रेरणा शक्ती ("ती" च्या शिवाय )म्हणजे आपल्या सारख्या परममित्रांची सदिच्छा आणि प्रेम आहे ....!!
मास्तर मस्त मस्त वाटली कविता , एकदम सोप्प्या शब्दात मनाची दुविधा आणि मनातले भाव कागदावर उतरवलेत
ReplyDeleteथोडक्यात म्हणायचं तर " लय भारी "
धन्यवाद तुषार....!!
ReplyDeleteतुला आवडणारच याची खात्री होती.
मलाही माझ्या कवितांमध्ये हि कविता जाम आवडते.
साली एक पोरगी , साली एक पोरगी
ReplyDeleteआदमी को .........बना देती है
शेरदिल शेर को लडकी ने कर दिया ढेर..
हा हा हा
ReplyDeleteबंडोपंत अगदी असच होत हो ..
शेरची पार बिल्ली करून टाकण्याची शक्ती या पोरींत असते.
नारीशक्ती, स्त्रीशक्ती वगैरे म्हणतात ती हीच असावी :)