धमालपूर .....
आंतरजालातील थोबाडपुस्तिकेवर आमचा चंचूप्रवेश झाला होता नुकताच तेव्हा आम्ही या गावाचे नागरिक झालो. तेव्हा नवीन होतो. हे सर्व काल्पनिक आहे याची जाणीव होती. इथ खूप वल्ली भेटल्या. अनेकांशी मैत्रीचे घट्ट धागे गुंफले गेले. या गावात आल्यावर या वैशिष्ट्यपूर्ण मंडळींच्या सहवासात वेळ कसा जातो हे कळत देखील नाही. हळू हळू हे संदर्भ बदलत गेले . हे काल्पनिक आहे हि जाणीव पुसट होत गेली. मग विजय ढेरेचा धाबा खराच वाटायला लागला. अनिल भाऊंच्या टपरीत रोज संध्याकाळी चहा प्यायला जाण्याची तल्लफ होऊ लागली. लीना, राधा चे न्याहरी ..जेवणासाठी येणारे पदार्थ देखील चाखून पहावेसे वाटू लागले.शिवाजी, योगेश, सारंग , विश्वनाथ, ऋषिका, अपर्णा, किशा, राधा हि मंडळी खर् या आयुष्यातल्या मित्रांइतकीच जवळची वाटत आहेत.आणि आज हि स्थिती आहे कि आमचे खरे गाव औंढी कि धमालपूर या विषयी आम्ही संभ्रमात आहोत.
..
आमची हि कविता त्या धमाल गावास
त्या धमालपुरास अर्पण.............!!
( टीप: ज्यांनी धमालपुरातली मजा अनुभवली आहे त्यांनाच या कवितेची मजा कळेल. बाकीच्यांना हि निव्वळ बडबडगीत वाटण्याचीच शक्यता आहे )
एक.... दोन.... तीन.... चार
धमालपुरातली पोर हुशार
एकापेक्षा एक नमुने त्यांचे
सांगेन तुम्हाला किस्से चार
विजय अनिल दुक्कल छान
आहेत मोठी अक्कलवान
गनिमी काव्यात यांची ख्याती
वरून मात्र सभ्य अन गरीब म्हणविती
किशाने काढले दारूचे दुकान
योगेश म्हणे एक बाटली आण
दोघेही पिऊन असतात तंग
पेशंटच यांच्या भल करो पांडुरंग
धमालपुरातला बहुरूपी गीते
बेन रोज एक नवे खाते बनविते
धमालपुरातला कृष्ण ओळखा
शिवाजीच्या मागे पोरींचा घोळका
लीनाला आवडते खाणे आणि गाणे
पोरीच्या या काही ठीक नाहीत लक्षणे
सारंग-विश्वा गप्पांना रंग आणतात
पण आवसेला गेलेले पुनवेलाच उगवतात
उगवत्या कवयित्री अपर्णा – ऋषिका
श्रोते म्हणतात यांचे माका-नाका माका-नाका
कवितांनी यांच्या झीट आणली गावाला
धडेच ते कविता म्हणायच्या नावाला
सुहास गुरुजी बिचारे साधे भोळे
वैतागून गेलेत या कार्ट्यामुळे
त्यांची न म्याडमची भिडवत असतात खाती
धमालपुरातली पोर फार करामती
सुहास भुसे

धमाल्पूर एक धमाकेदार गाव, त्यात रमले सुहासराव
ReplyDeleteहा हा हा ...
ReplyDeleteअरे फार धमाल असते तिथ ..
आपल्या छत्रपती समुहात गंभीर चर्चा करून आलेला ताण तिथ क्षणात हलका होतो .
बघ नं जोइन होऊन ...
मजा असते ..फार
अतिशय सुंदर यार .......खरच तुझ्यातला कवी जागा झालाय म्हणायचं ...गुड लक ...अशाच छान कविता बघायला भेटतील लवकरच अशी इच्छा करतो
ReplyDeleteधन्यवाद लक्षमण ...
ReplyDeleteनक्कीच तुझ्या आशेनुरूप माझ्याकडून लेखन घडेल याचा आत्मविश्वास आहे.