माझ्यासाठी वेड्या कशास इतका तडफडतोस
तुझी सय कशी न येत मज, खरेच सांगते
मी तुझीच जाणूनही कशास अजाण बनतोस...
मी दूर आहे तुझ्यापासून फक्त शरीराने
मनात तुझ्या मी अन माझ्या अंतरी तुच वसतोस...माझी आठवण आली तर डोळे मिटताच दिसेन
डोळे ताणून फुलाफुलात कशास मला शोधतोस...तुझी सय कशी न येत मज, खरेच सांगते
तू दूर कुठे, तू तर माझ्याच हृदयी राहतोस...
मी स्वत: ला कधीच अर्पण केले आहे तुला
रोज देवाकडे कशास मलाच मागतोस...तुझ्या भेटीस नसले तरी स्वप्नात येईन रोज
चंद्रात माझा चेहरा पाहात कशास उगा जागतोस...
-सुहास भुसे

No comments:
Post a Comment